जिल्ह्यात 31 उमेदवारांकडून 36 नामनिर्देशनपत्र दाखल

रत्नागिरी:- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी 31 उमेदवारांनी 36 नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडाल्यापासून जिल्ह्यात इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू केली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दोन दिवशी उमेदवारांनी निरुत्साह दाखवल्यानंतर मात्र उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झाली. पाचही मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात जोरदार लढत असून काही ठिकाणी अपक्ष उमेवार महत्वाची भूमिका बजावण्याचे शक्यता आहे.

मंगळवारी दाखल झालेल्या विधानसभा मतदार संघनिहाय नामनिर्देशन पत्रांची माहिती पुढीलप्रमाणे-
263- दापोली विधानसभा मतदार संघामध्ये कदम संजय वसंत – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), कदम संजय संभाजी -अपक्ष, कदम संजय सिताराम – अपक्ष, मर्चंडे प्रविण सहदेव – बहुजन समाज पार्टी, कदम योगेश रामदास – अपक्ष, कदम योगेश विठ्ठल -अपक्ष, अनंत पांडुरंग जाधव – राष्ट्रीय समाज पक्ष.
264- गुहागर विधानसभा मतदार संघामध्ये संदेश दयानंद मोहिते -रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), दिपक केशव शिगवण – अपक्ष, संतोष लक्ष्मण जैतापकर -अपक्ष, सुनिल सखाराम जाधव – अपक्ष (2 नामनिर्देशन पत्र) , सुनिल सुधिर काते – अपक्ष, मोहन रामचंद्र पवार -अपक्ष, सादिक मुनीरुद्दीन काझी -संभाजी ब्रिगेड पार्टी
265- चिपळूण विधानसभा मतदार संघामध्ये अमित रोहिदास पवार -अपक्ष, शेखर गंगाराम निकम -अपक्ष (2 नामनिर्देशन पत्र), शेखर गोविंदराव निकम (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी -2 नामनिर्देशन पत्र), प्रशांत भगवान यादव -अपक्ष (2 नामनिर्देशन पत्र), नसिरा अब्दुल रहमान काझी – अपक्ष, सुनिल हरिश्चंद्र वेतोसकर – अपक्ष, संतोष पांडुरंगराव शिंदे – समाज विकास क्रांती पार्टी ,
266 – रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये उदय विनायक बने -अपक्ष, भारत सिताराम पवार -बहुजन समाज पार्टी, कोमल किशोर तोडणकर – अपक्ष, दिलीप काशिनाथ यादव – अपक्ष, पंकज प्रताप तोडणकर – अपक्ष, कैस नुरमहमद फणसोपकर -अपक्ष, सुरेंद्रनाथ यशवंत माने – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
267-राजापूर विधानसभा मतदार संघामध्ये संजय आत्माराम यादव -अपक्ष, राजश्री संजय यादव – अपक्ष, राजेंद्र रविंद्रनाथ साळवी -अपक्ष (2 नामनिर्देशन पत्र)