रत्नागिरी:- पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते ना. उदय सामंत यांनी उबाठा शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. उबाठा शिवसेनेने नव्याने युवा सेना जिल्हायुवा अधिकारी पदी नियुक्ती केलेले जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पत्रकार परिषदेत ना. उदय सामंत यांनी परशुराम कदम यांचे शिवसेनेत स्वागत केले. तर युवा सेना कोकण विस्तारक पदी त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री ना.
एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे उबाठा शिवसेनेला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी पक्षप्रवेशाचा झपाटा सुरू केला आहे. उबाठाच्या महिला तालुका संघटक साक्षी रावणंग यांच्यासह जिजाऊ सामाजिक संघटनेतील प्रथमेश गावणकर यांची यांचा पक्षप्रवेश करून घेतला. त्यानंतर मंगळवारी हातखंबा जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी समाज कल्याण सभापती तथा जिल्हा युवा अधिकारी परशुराम कदम यांनी मंगळवारी शेकडो समर्थकांसह पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. ना. उदयसामंत यांच्या माध्यमातूनच आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली होती. काही काळ आपण त्यांच्यापासून दूर होतो. परंतु मतदारसंघाच्या सर्वांगी विकासासाठी साहेबांना साथ देण्याचा निर्णय माझ्यासह माझ्या सहकाऱ्यांनी घेतला आहे. साहेबांनी आमचे पक्षात स्वागत केले आहे. तर आपण ज्या पक्षांमध्ये होतो, त्या पक्षांमध्ये निष्ठावंतांना डावलण्यात येत आहे. उदय बने माझे ज्येष्ठ सहकारी होते. त्यांचा विधानसभा उमेदवारीवर हक्क होता. परंतु त्यांना डावलण्यात झाल्याने आपणही नाराज झाल्याचे परशुराम कदम यांनी सांगितले.