सोमवारी जिल्ह्यात 16 उमेदवारांची 19 नामनिर्देशनपत्र दाखल

रत्नागिरी:- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी 16 उमेदवारांनी 19 नामनिर्देशन पत्र दाखल केली अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.

सोमवारी दाखल झालेल्या विधानसभा मतदार संघनिहाय नामनिर्देशन पत्रांची माहिती पुढीलप्रमाणे- 263- दापोली विधानसभा मतदार संघामध्ये कदम योगेश रामदास – शिवसेना (प्रस्तावकामार्फत दाखल), खांबे ज्ञानदेव रामचंद्र – अपक्ष, खाडे सुनिल पांडुरंग -अपक्ष, अबगुल संतोष सोनू यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अपक्ष अशी 2 नामनिर्देशनत्रे दाखल केली आहेत.
264- गुहागर विधानसभा मतदार संघामध्ये फडकले संदीप हरी – अपक्ष, जाधव विक्रांत भास्कर -शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), बेंडल राजेश रामचंद्र – शिवसेना, गांधी प्रमोद सिताराम – महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि प्रमोद परशुराम आंब्रे – राष्ट्रीय समाज पक्ष अशा एकूण 5 उमेदवारांची 5 नामनिर्देशन पत्रे दाखल केली.
265- चिपळूण विधानसभा मतदार संघामध्ये शेखर गोविंदराव निकम – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी यांनी 2 नामनिर्देशन पत्र आणि सुनिल शांताराम खंडागळे – अपक्ष अशा 2 उमेदवारांनी 3 नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत.
266- रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये सुरेंद्रनाथ यशवंत माने – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांनी 1 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.
267- राजापूर विधानसभा मतदार संघामध्ये अमृत अनंत तांबडे -अपक्ष, अविनाश शांताराम लाड -अपक्ष, जाधव संदीप विश्राम – बहुजन समाज पार्टी, राजन प्रभाकर साळवी – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांनी 2 नामनिर्देशन पत्र असे एकूण 4 उमेदवारांची 5 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत.
000