जिजाऊ संघटनेच्या प्रथमेश गावणकर यांचा शिवसेनेत प्रवेश

रत्नागिरी:- जिजाऊ संघटनेचे रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांनी धनुष्यबाण हाती घेतलं असून शिवसेनेत समर्थकांसह प्रवेश केल्यानंतर गावणकर यांची शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुखपदी नियुक्ती केली असल्याची माहिती ना. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर रत्नागिरीत शिवसेना (एकनाथ शिंदे) या पक्षात जोरदार इनकमिंग चालू झाली आहे. दररोज नवनवीन पक्षप्रवेश सुरू झाले आहेत. रत्नागिरी तालुक्यात जिजाऊच्या माध्यमातून प्रथमेश गावणकर यांनी मोठे सामाजिक संघटन उभे केले आहे. सर्वांना विश्‍वासात घेऊन गावणकर यांनी हा निर्णय घेतला आहे. एका धडाडीच्या कार्यकर्त्याच्या कार्याची दखल घेणं हे माझं काम आहे त्यामुळेच प्रथमेश यांना न्याय मिळावा, यासाठी त्यांची शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुखपदी नेमणूक केली असल्याची माहिती ना. सामंत यांनी दिली.
यावेळी बोलताना ना. सामंत पुढे म्हणाले की, बळीराजा सेनेचे अध्यक्ष अशोक वालम यांची रात्री बारा वाजता मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली. या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असेल तर आम्हीदेखील स्थानिकांसोबत उभे राहू, येत्या २ दिवसांत रिफायनरी विरोधकांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती ना. सामंत यांनी दिली.