शिवसेनेच्या पहिल्याच यादीत उदय सामंत, किरण सामंत यांच्या उमेदवारीची घोषणा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यामधून शिवसेनेनं तीन जागांसाठी आपले उमेदवार निश्चित केले आहे. पहिल्या यादीमध्ये दापोली विधानसभा मतदारसंघासाठी योगेश कदम यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदय सामंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघातून किरण सामंत यांच्या नावाची घोषणा शिवसेनेनं केली आहे.

गुहागर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडेच राहणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. मंगळवारी गुहागर येथील राजेश बेंडल यांनी ना. सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांना गुहागर मधून सेनेचे तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे.