जि.प.च्या ‘त्या’ अधिकाऱ्याचा कार्यभार काढला, चौकशी सुरू

रत्नागिरी:- जिल्हा परिषद शिक्षण विभागातील वादग्रस्त शिक्षण विस्तार अधिकाऱ्याकडून शिक्षिकांना मानसिक त्रास होत असल्याची गंभीर दखल घेत जि. प. सीईओ कीर्तीकिरण पुजार यांनी घेतली आहे. त्या विस्तार अधिकाऱ्यांची चौकशी लावली असून त्याचा अहवाल येईपर्यत त्यांचा कार्यभार काढून घेतल्याचे पूजार यांनी सांगितले.

गेल्या महिनाभराच्या काळात तालुक्यातील दोन शिक्षिकांकडून जि. प. प्रशासनाकडे तक्रारी आहे. दाखल झालेल्या आहेत. त्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांविरोधात मानसिक त्रासाबाबबत २४ सप्टेंबरला पहिली रितसर लेखी तक्रार झाली होती. अजून यावर निर्णय झाला नसतांना आता पुन्हा एका शिक्षिकेने त्याच विस्तार अधिकाऱ्याच्या विरोधात लेखी तक्रार जि. प.प्रशासनाकडे केली आहे. महिला शिक्षिकांकडून दोनवेळा या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याच्या विरोधात दाखल झालेल्या तक्रारींची पूजार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली