९० हजाराची महिलेची ऑनलाईन फसवणूक

रत्नागिरी:- सोशल मिडीयाच्या बीटकॉईन जास्त पैसे कमविण्याचे अमिष दाखवून फिर्यादी महिलेच्या बॅंक खात्यातून ९० हजार १९५ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या अज्ञाताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २३ ऑगस्ट २०२४ ला सकाळी साडेनऊ ते दुपारी चार या वेळात श्रीरंगाई अपार्टमेंट धन्वंतरी हॉस्पीटल शिवाजीनगर, रत्नागिरी येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेने त्यांचा सोशल मिडियाच्या साईटवर तुम्ही घरी बसून बीट कॉईन मध्ये पैसे गुंतवून पैसे कमवू शकता अशी जाहिरात पाहिली. त्या जाहिरातीवर लिंक केले असता. अज्ञाताने फिर्यादीशी संपर्क करुन बिट कॉईनमध्ये गुंतवणूक करुन जास्त पैसे कमविण्याचे अमिष दाखवून त्यांच्या खात्यातून ९० हजार १९५ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी फिर्यादी महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.