महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा विश्वास
रत्नागिरी:- रत्नागिरीत आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी आमदार बाळ माने हे लवकरच उबाठामध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. पण बाळासाहेब हे आमचे नेते आहेत, त्यांची निवडणूक लढण्याची इच्छा आहे की नाही हे माहित नाही. पण ते भाजपाचे प्रामाणिक नेतृत्व आहे, ते आमचे आहेत आणि आमचेच राहतील असे भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा आमदार चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
येथील भाजपा जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमती वाघ बोलत होत्या. त्यांनी बाळ मानेंच्या रत्नागिरी उबाठा पक्ष प्रवेशावर आपली भूमिका स्पष्ट केली. निवडणूक लढण्याची प्रत्येकी इच्छा असते, त्यात काहीही वावगे नाही. पण प्रत्येक गोष्ट पदरात पडेल असे नाही. त्यासंदर्भात ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्याशी बोलले आहेत. बाळ माने हे एक प्रामाणिक नेतृत्व आहे, त्याबद्दल कुणी काळजी करू नये असेही वाघ म्हणाल्या.
विधानसभेसाठी कोण उमेदवार असेल हे तिन्ही पक्षांच्या महायुतीचे नेते ठरवतील त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी सर्वांचे असल्याचे भाजपाया नवनिर्वाचीत आमदार चित्रा वाघ यांनी सांगितले. महायुती पक्षांतर्गंत कुणाला उमेदवारी द्यायची जाईल. येत्या दोन दिवसांत समोर येईल. हे महायुतीचे सरकार आहे, तीन पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे कोणती जागा कुणाला द्यायची या उमेदवारीसंदर्भात आमचे नेते निर्णय देतील असेही त्यांनी सांगितले.
आमचा भाजपा पक्ष शिस्तीचा आहे, बेशिस्त नाही. आतापर्यंत आमच्यासारखी बांधणी कुठेच नाही. निवडणुकीला गडबड करावी लागत नाही. त्यामुळे भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे आम्हाला जो आदेश देतील ते काम आम्ही करणार असल्याचे वाघ यांनी सांगितले. येत्या विधानसभेसाठी भाजपाच्या महिला आमदारांचा आकडा जास्त असेल, असेही त्या म्हणाल्या.