आठवडा बाजार येथील महिलेची एक लाखांची फसवणूक

रत्नागिरी:- मिटींग कॉन्फरन्स ई-मेल आयडीवरुन फोन करुन फिर्यादी यांचा बॉस असल्याचे भासवून, सप्राईज गीफ्ट खरेदी करण्याचे सांगून क्रेडीट कार्ड व डेबिट कार्ड वरुन फिर्यादी यांना २१ गिफ्टसाठी १ लाख ५ हजाराची फसवणूक करणाऱ्या अज्ञात संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (ता. ३) सकाळी साडेदहा ते दुपारी दीडच्या सुमारास आत्मबंधू प्लाझा, आठवडा बाजार रत्नागिरी येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी श्वेता नथुराम साळसकर (रा. आठवडा बाजार, रत्नागिरी) या घरात असताना अज्ञात संशयिताने मिटींग कॉन्फरन्स जी मेल आयडी वरुन श्वेता यांना मेल करुन त्यांना जेसल मेहता हे त्यांचे बॉस असल्याचे भासवले. तसेच त्यांच्या व्हॉटसअॅपवर चॅटींगकरुन स्टाफसाठी सप्राईज गिफ्ट खरेदी करण्यास सांगून क्रेडीट कार्ड व डेबीट कार्ड वरुन श्वेता यांना २१ गिफ्टसाठी १ लाख ५ हजाराची फसवणूक केली. या प्रकरणी श्वेता साळसकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.