रत्नागिरी:- महाविकास आघाडीकडून रत्नागिरी विधानसभेसाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी घेतलेल्या बैठकीत निष्ठावंतांनाच संधी द्यावी अशी मागणी विभागप्रमुखांनी केली. त्यातही उदय बने यांच्यांकडे अधिकचा कल पदाधिकार्यांचा दिसून आला. दसर्यापर्यंत या मतदार संघातील उमेदवारीबाबतचे ‘पिक्चर’ क्लिअर होईल असे माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
रत्नागिरी दौर्यावर आलेल्या उबाठाचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांनी खासदार कार्यालयात रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील विभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी सहसंपर्कप्रमुख राजू महाडीक, माजी जि.प. उपाध्यक्ष उदय बने, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या पदाधिकार्यांसोबत माजी खा. राऊत यांनी चर्चा करुन, त्यानंतर विभागप्रमुख हेमंत पवार, मयुरेश पाटील, राकेश साळवी, महेंद्र झापडेकर, उत्तम मोरे, किरण तोडणकर, भाऊ देसाई यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. या सर्वांशीच वैयक्तिक चर्चा करुन त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर सर्वच पदाधिकार्यांशी एकत्रित चर्चा केली. यावेळी उदय बने यांनी राजू महाडीक यांना आपल्याला एकवेळ संधी मिळावी, पुढील वेळी तुमचा विचार पक्ष करेल असे सांगितले. मात्र उमेदवारीबाबत अंतिम निर्णय पक्षाध्यक्षच घेतील असेही विनायक राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पक्ष जो कोणी उमेदवार देईल त्याचे प्रामााणिक काम करु, मात्र पक्षातीलच उमेदवार असावा अशा भावना सर्वांनी व्यक्त केला. उबाठाकडून दसर्यापर्यंत विधानसभेच्या उमेदवाराबाबत नक्की केले जाईल असेही त्यांनी सांगितले.