शासकीय योजनांचे कार्यालय असल्याचे भासवून कामगारांची मोठी फसवणूक

रत्नागिरी:- शासनांच्या योजनांचे कार्यालय असल्याचे भासवून कामगारांकडून कामगार नोंदणी, नुतनीकरण या करिता हजाराच्या पटीत कामगारांकडून फि उकळून कामगारांची फसवणूक करणाऱ्या वाळवा (ता. सांगली) येथील तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नरेंद्र करंजुसकर (रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना ऑगस्ट २०२४ ते २४ सप्टेंबरला ला शिवरुद्र प्राईड, दुसरा मजला, शिवाजीनगर-रत्नागिरी येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित नरेंद्र करंजुसकर याने ऑगस्ट ते २९ सप्टेंबर २०२४ या दरम्याने शहरातील शिवाजीनगर येथे शिवरुद्र, दुसरा मजला येथे स्वतःचे खासगी कार्यालय सुरु करुन त्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून बांधकाम कामगारांसाठी असलेल्या योजनेसाठी कामगारांना शासनाच्या कार्यालयाचा भाग असल्याचे भासवले व कामगारांकडून नोदणी, नुतणीकरण या करिता १ रुपया फि असताना १ हजार ते दीड हजार रुपये फि उकळून कामगारांची फसवणूक केली या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.