वामन द्वादशीला जिल्ह्यात १ हजार ८८३ बाप्पांना निरोप

रत्नागिरी:- गणपती बाप्पा मोरया, पुढच्यावर्षी लवकर या’ अशा धोषणेत आणि ढोल ताशांच्या गजरात जिल्ह्यात गणेशोत्सवातील वामनद्वादशीच्या दिवशी 1 हजार 883 खासगी तर 9 सार्वजिनक गणपतींना निरोप देण्यात आला. शहरात ठिकठिकाणी पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील कर्ला-आंबेशत, खालची आळी, नाचणे, खालची आळी, तसेच शहरजवळी बसणी, काळबादेवी, कोतवडे येथील तर जिल्ह्यातील 1 हजार 883 गणपतीचे तर नऊ सार्वजनिक गणपतीचे उत्साहात विसर्जन झाले.

जिल्ह्यात ठिकठिकाणी समुद्रकिनारी अथवा पाणवठ्यावर गणपतीचे विसर्जन झाले. येथील भाट्ये आणि मांडवी किनारी सायंकाळी तीन वाजल्यापासून गणेशभक्तांची वर्दळ वाढली होती. रविवारी सकाळी पावसाने चांगल्या प्रकारे वर्णी लावली होती मात्र दुपार नंतर पावसाने काही उसंत घेतल्यामुळे गणेशभक्तांच्या आनंद द्विगुणीत झाला होता. गर्दी टाळण्यासाठी गणेशभक्तांनीही यावेळी गणपती विसर्जनाला लवकर सुरवात केली होती. दुपारी दोन वाजल्यापासून मांडवी समुद्रावर किनारी गणेशभक्तांची ये-जा सुरु झाली होती. पोलिसांचा बदोबस्त कडक ठेवण्यात आला होता.
दीड दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनाला कमी गर्दी होती. गौरी गणपती विसर्जनाला शहरात तसेच ग्रामीण भागात समुद्र किनारी व पाणवठ्यावर लोकांची गर्दी पहायला मिळाली होती मात्र गणेशविसर्जन शांततेत झाले. वामन द्विदशीला ही रस्त्याने जाणारे भक्त ढोलताशाच्या गजरात विसर्जनाला शांततेत व शिस्तीत मांडवी-भाट्ये किनारी येत असल्याचे दिसत होती. वाहतूकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जागोजागी पथक तयार ठेवले होते. निर्माल्यासाठी पालिकेने कलश उभारण्यात आले होते. तर गणेशभक्तांना सुचनाही देण्यात येत होत्या. अगदी भक्तीमय वातावरणात वामद्वादशीचे मांडवी किनारी विसर्जन झाले.