टास्क पूर्ण करण्याच्या अमिषाने महिलेची एक लाखाची फसवणूक

रत्नागिरी:- इंन्स्टाग्राम ॲपवर वेगवेगळे टाक्स पुर्ण केल्यावर जास्तीत जास्त परतावा देण्याचे अमिष दाखवून महिलेची १ लाख ३ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पियुष यादव, मिनाक्षी गानोरकर (पुर्ण नाव गाव पत्ता माहित नाही) असे संशयित आहेत. ही घटना १८ ते १९ जुलै सायंकाळी पावणेसातच्या सुमारास शाश्वत बंगला फणसोप सडा रत्नागिरी येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयितांनी फिर्यादी महिलेच्या इन्स्टाग्राम ॲपवर एक लिंक पाठवली व टेलीग्राम ॲपवर बोलणे करुन वेगवेगळे टास्क पुर्ण केल्यावर जास्तीत जास्त परतावा देण्यात येईल असे अमिष दाखविले. फिर्यादी यांनी त्यांच्या बहिणीच्या बॅक ऑफ इंडियाचे बॅक खात्यावरुन वेगवेगळ्या बॅक खात्यावर गुंतवणुकीसाठी रक्कम संशयितांनी स्विकारली. त्यांनतर फिर्यादी महिलेने भरलेल्या १ लाख तीन हजारापैकी ३ हजार रक्कम संशयितांनी परत केली. मात्र १ लाख रुपये परत न करता फसवणूक केली. या प्रकरणी महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.