खेडशी येथे दोन दुचाकीमध्ये अपघात, एक जण जखमी

रत्नागिरी:- दुचाकी चालविण्याचा परवाना नसताना दुसऱ्या दुचाकीला धडक देऊन अपघात करण्याऱ्या स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हणमंत साबान्ना चित्तप्पगोल (वय ३२, रा. बालाजी पॅराडाईज, रवींद्र नगर, कुवारबाव. मुळ विजापूर) असे संशयित दुचाकी स्वाराचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ६) सप्टेंबरला रात्री नऊच्या सुमारास खेडशी-गयाळवाडी येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित हणमंत यांच्याकडे दुचाकी चालविण्याचा परवाना तसेच इन्शुरन्स, पियुसी नसताना दुचाकी (क्र. एमएच-०३ बीई १६०१) घेऊन खेडशी गयाळवाडी येथे जात असताना दुचाकी निष्काळजीपणे चालवून दुचाकी (क्र. एमएच-०८ बीए ८१६४) हीला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रणीत रमेश खापरे (रा. खेडशी, डफळचोळवाडी, रत्नागिरी) हे जखमी झाले व दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.