क्षुल्लक कारणातून पत्नीवर कोयतीने वार

रत्नागिरी:- तालुक्यातील पूर्णगड येथे क्षुल्लक कारणातून पतीने पत्नीला शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यानंतर पतीने पत्नीच्या डाव्या पायावर धारदार कोयतीने वार करून तिला जखमी केल्याची घटना गुरूवारी घडली.

या प्रकरणी पूर्णगड पोलिसात पती पदम जुबीलाल देसाई (३५) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी पदम हा आपल्या पत्नीकडे विडी व माचीस घेण्यासाठी पैसे मागत होता. त्यावेळी पत्नीने पैसे देण्यास त्याला नकार दिल्याने पत्नीला धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर कोयतीने पत्नीच्या डाव्या पायावर वार करून तिला दुखापत केली. या प्रकरणी त्याच्या पत्नीने पूर्णगड पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार देसाई याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा तपास पूर्णगड पोलीस करीत आहेत.