रेल्वेस्टेशन, बसस्थानके, महामार्गावर चाकरमान्यांची कसून तपासणी

१६८ चाकरमानी सर्दी तापाने बाधित

रत्नागिरी:- गणेशोत्सवासाठी जिल्हय़ात चाकरमानी दाखल झाले. त्यादरम्यान येथील विविध रेल्वेस्थानके, बसस्थानके आणि महामार्गावर तपासणी बुथवर एकूण 314 चाकरमान्यांनी तपासणी करून घेतली. त्यावेळी गावाकडे आलेले 168 चाकरमानी सर्दी-तापाने बाधित असल्याचे समोर आले. त्यांना योग्य उपचार देण्यात आले.

कोकणात दरवर्षी मोठय़ा उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. यासाठी लाखोंच्या संख्येने चाकरमानी आपल्या गावाला दाखल होतात. सध्या पाऊस सुरू झाला आहे. तर काहीवेळा ऊन पावसाचा खेळ असल्याने वातावरणात बदल झाला आहे. याचा फटका आरोग्यावर होत असून सध्या जिल्ह्यात सर्दी, ताप, डेंग्यू, मलेरिया याची बाधा अनेकांना झालेली आहे.

त्यामुळे जिल्ह्य़ात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मुंबई व इतर ठिकाणी नोकरीनिमित्त असलेले चाकरमानी मोठय़ा प्रमाणात वाहनांनी, एसटी बसने, रेल्वेने गावी आले. त्यामुळे जिल्हय़ात होणाऱ्या साथ आजारांच्या पार्श्वभूमीवर महामार्ग, बसस्थानके, रेल्वेस्थानके येथे 24 तास आरोग्य पथके रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. रेल्वेस्थानके, बसस्थानके आणि महामार्गावर ठिकठिकाणी आरोग्य विभागो तपासणी बुथ तयार करण्यात आले. त्याठिकाणी देणाऱ्या चाकरमानी प्रवाशीं 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान आरोग्य पथकांमार्फत तपासणी करण्यात आली.
त्या तपासणीमध्ये रेल्वेस्थानकांवर एकूण 116 जणांनी आरोग्य तपासणा लाभ घेतला. बसस्थानकांवर 150 जणीं, खासगी ट्रव्हल्सने आलेल्या 16 जणीं इतर वाहनांतील 32 अशा एकूण 314 ाााकरमानी प्रवाशीं तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सर्दी-ताप-खोकल्यो 168 चाकरमानी तर इतर आजार असलेल्या 80 जण आढळून आले. आरोग्य पथकांमार्फत 249 जणांना प्राथमिक उपार देण्यात आले. तर 7 जणांचे रक्तनमुनेही घेण्यात आल्या अहवाल करण्यात आला आहे.