गणेशोत्सवात 215 शिक्षक कार्यमुक्त; रिक्त पदांची संख्या 900 वर

रत्नागिरी:- जिल्हय़ात प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा विषय रिक्तपदांमुळे वादग्रस्त ठरलेला आहे. गेल्या 4 वर्षात दीड हजार पेक्षा जास्त शिक्षक हे आंतरजिल्हा बदलीने जिह्याबाहेर गेले आहेत. आता नव्याने ऐन गणेशोत्साया प्रारंभाला 215 शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले असल्याने पुन्हा एकदा शिक्षकीं समस्या उभी ठाकली आहे. यामुळे जिल्ह्य़ात 900 पदे रिक्त झाली आहेत.

जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांया रिक्त पदांच्या संख्येमुळे जिल्हय़ातील शैक्षणिक कारभार चालवताना जि.प. प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत होती. नुकत्या सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षी आंतरजिल्हा बदल्या तसेच सेवानिवृत्त होणाऱया शिक्षकांच्या संख्येमुळे जवळपास 2 हजार पदं रिक्त होती. पण शासनाने 1 हजार 34 शिक्षक पदे भरण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार पवित्र पोर्टलद्वारे मे महिन्यात 997 शिक्षकांची भरती झाली. त्यामुळे शिक्षण विभागाला मोठा दिलासा लाभला होता.
या भरती प्रक्रियाया पहिल्या टप्प्यात जिल्ह्य़ात 397 शिक्षकों समुपदेशन होउन त्यापैकी 352 जणांना नियुक्त्या देण्यात आल्या होत्या. या नव्या प्रक्रियेत एकूण 1 हजार 437 शिक्षकीं पदे भरण्यात आली. त्यानंतरही 750 पदे रिक्त राहिली. या रिक्त पदांमुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना गेल्या काही वर्षांपासून तारेवरची कसरत करावी लागत आहे. येथील शाळांवरील रिक्त शिक्षकांची पदांची संख्येमुळे शेक्षणिक ओढाताण सुरू आहे.

मागील काही दिवसांपूर्वी आंतरजिल्हा बदलाया यादीवरील 150 शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आलेले होते. त्यामुळे येथील आंतरजिल्हा बदली व नियमित सेवानिवृत्त शिक्षकांमुळे रिक्त पदांची संख्या वाढत आहे. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा विषय रिक्तपदांमुळे वादग्रस्त ठरलेला आहे. गेल्या 4 वर्षात दीड हजार पेक्षा जास्त शिक्षक हे आंतरजिल्हा बदलीने जिह्याबाहेर गेले आहेत. नवी शिक्षक भरती झाली तरी जवळपास 900 शिक्षक पदे रिक्तच राहणार आहेत.