शिक्षक दिनी जि. प. च्या आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा

रत्नागिरी:- शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यकार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी जिल्हा परिषदेच्या ९ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार आणि एका शिक्षकाला विशेष पुरस्कार जाहीर केला. आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण लवकरच करण्यात येणार असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हा परिषदेच्या २५ शिक्षकांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे आले होते. त्या सर्व शिक्षकांच्या जिल्हास्तरिय निवड समितीने मुलाखती घेतल्या. तसेच आदर्श पुरस्काराच्या निकषाप्रमाणे त्या शिक्षकांचे गोपनीय अहवाल, शिष्यवृत्ती परिक्षा मार्गदर्शन, शैक्षणिक संशोधन लेखन व व्याख्यान व संमेलनातून शैक्षणिक कार्य, साक्षरता अभियान शिक्षणाचे सार्वत्रिकरण, शैक्षणिक पात्रता वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न, शैक्षणिक मार्गदर्शन स्पर्धा परीक्षा अभ्यासात मागे, शालेय कामाबाबत वरिष्ठांचे अभिप्राय, शैक्षणिक उठाव असे निकष तपासण्यात आले. त्यानंतर आदर्श शिक्षक पुरस्काराची निवड करण्यासाठी प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडे मंजूरीसाठी पाठवण्यात आले होते. त्याची मंजूरी आल्यानंतर आज मुख्यकार्यकारी अधिकारी पुजार यांनी हे पुरस्कार जाहीर केले. त्यांची नांवे खालीलप्रमाणे आहेत.

मंडणगड- अहमद हसनमियाँ नाडकर (जिल्हा परिषद शाळा धुत्रोली उर्दू), दापोली- महेश पांडुरंग गिम्हवणेकर (जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा आसूद क्र.१), खेड- संतोष बाळकृष्ण बर्वे (जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा धामणदेवी बेलवाडी), चिपळूण- मौला गुलाब नदाफ, (जिल्हा परिषद आदर्श शाळा मुंढे तर्फे चिपळूण), गुहागर- राहुल साधू आमटे (जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा जानवळे क्र.१), संगमेश्वर- कारभारी लहानु वाडेकर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेड खुर्द क्र.१), रत्नागिरी- माधव विश्वनाथ अंकलगे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी), लांजा उमेश केशव केसरकर (जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरवली क्रमांक १, राजापूर- सुहास पांडुरंग दोरुगडे (जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा करक क्रमांक १)

विशेष पुरस्कार-
चिपळूण- कुंदा मुलू मोरे (जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पिंपळी खुर्द)

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी बी एम कासार, उपशिशणाधिकारी सुनीता शिरभाते, प्रशासन अधिकारी संजय नलावडे उपस्थित होते.