रत्नागिरी शहर पथविक्रेता समितीचे पाच सदस्य बिनविरोध

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर पथविक्रेता समितीची पहिलीच सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. एकूण आठ सदस्यांपैकी पाच सदस्यांची निवड बिनविरोध झाली आहे. इतर तीन प्रवर्गातून नामनिर्देशनपत्रच दाखल न झाल्याने ती पदे रिक्त राहिली आहेत.

रत्नागिरी नगर पथविक्रेता समिती सार्वत्रिक निवडणूकीचे निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी काम पाहिले. सर्वसाधारण प्रवर्गातून सुहेल चंद्रकांत शिवलकर, सतीश नारायण मोरे, सर्वसाधारण महिला आरक्षित प्रवर्गातून अमिता मृणाल वारंग, इतर मागास महिला प्रवर्गातून गौरी प्रतिश शिवलकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

अनुसूचित जमाती प्रवर्ग, अल्पसंख्यांक प्रवर्ग आणि दिव्यांग प्रवर्गातून नामनिर्देशन पत्रच दाखल न झाल्याने ही तीन सदस्यपदे रिक्त राहिली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी शुक्रवारी दुपारी बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांची नावे जाहीर करून त्या सदस्यांना प्रमाणपत्र दिली. 26 ऑगस्टपासून ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती.