‘एर्नाकुलम एक्स्प्रेस’मध्ये ७९ हजारांची चोरी

रत्नागिरीः– कोकण रेल्वेच्या एर्नाकुलम सुपरफास्ट एक्स्प्रेमधून प्रवास करणाऱ्या प्रवासाच्या बॅगेमधील ७९ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरट्याने पळवला. राजापूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ६ जुलैला सकाळी पावणेनऊच्या सुमारास राजापूर रेल्वेस्टेशनदरम्यान निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एर्नाकुलम सुपरफास्ट एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना चोरट्याने ते झोपी गेल्याचा फायदा घेऊन राजापूर रेल्वे स्टेशनदरम्यान त्यांच्या बॅगेमधील ६० हजाराचा लॅपटॉप, १३ हजाराचा टॅब आणि ५ हजाराचे हेडफोन, १ हजाराची पॉवरबँक, १०० रुपयांचा चार्जर असा ७९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पळविला. या प्रकरणी फिर्यादी प्रवाशाने राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.