पाली-घडशीवाडी येथे एकाला मारहाण

रत्नागिरी:- तालुक्यातील पाली-घडशीवाडी येथे अज्ञात कारणातून एकाला मारहाण केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना सोमवार 19 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वा.घडली. सुजय संतोष माईन (रा.पाली माईनवाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात सिध्दनाथ काशीनाथ गराटे (35, रा.गराटेवाडी पाली,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार, सोमवारी दुपारी ते पाली बाजारपेठेतून घरी जात होते. त्यावेळी घडशीवाडी येथे आले असता तेथ उभा असलेल्या सुजय माईनने त्यांच्या तोंडावर मारले. म्हणून फिर्यादीने तेथील काठी उचलून आरोपीच्या पायावर मारली. याचा राग आल्याने संशयित आरोपी सुजय माईनने बाजुच्या कंपाउंडला असलेल्या चिव्याच्या काठीने फिर्यादीच्या पाठीवर तसेच डाव्या डोळ्याचे व गालाचे मध्ये मारुन दुखापत केली.