रत्नागिरी:- येथील स्वयंभू काशीविश्वेश्वर मंदिरात श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी नामसप्ताहाला सुरुवात झाली असून, श्रावण महिन्यात मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रावणाच्या पहिल्या सोमवारी दुपारी 12.30 वाजता नामसप्ताहाला सुरुवात होते आणि दुसर्या सोमवारी दुपारी साडेबाराला नामसप्ताहाची सांगता होते. पहिल्याच सोमवारी श्री काशीविश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. श्रावणाच्या दुसर्या सोमवारी या नामसप्ताहाची सांगता होणार आहे. यावेळी मांडवी येथील श्रीदेव भैरीबुवाच्या पालखीची व काशीविश्वेश्वराच्या पालखी भेटीचा सोहळा दुपारी रंगणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी राजिवडा घाटी येथे भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
श्रावणाच्या तिसर्या सोमवारी 19 ऑगस्ट रोजी तर 26 ऑगस्ट रोजी चौथ्या सोमवारी मंदिरात भजनाचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार 27 रोजी गोपाळकाळा असून या दिवशी पेठकिल्ला येथील श्री सांब देवाची पालखी विश्वेश्वर मंदिरात सायंकाळी 6 वा. भेटीसाठी येणार आहे.
3 ऑगस्ट रोजी पाचव्या सोमवारी मंदिरात श्री लक्ष्मीसहीत सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वयंभू काशी विश्वेश्वर देवस्थान समिती राजिवडा यांनी केले आहे.