दापोली:- तालुक्यातील पांगारी विठ्ठलवाडी येथील अशोक बबन जाधव या 52 वर्षीय प्रौढाचा खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार 3 ऑगस्ट रोजी उघडकीस आली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक जाधव हे 30 जुलै रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास पांगारी जेटी येथे गेले होते. तेथून ते पुन्हा घरी न आल्याने शोधाशोध करण्यात आला. ते कोठेही आढळून न आल्यामुळे दापोली पोलिसात ते बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास पांगारी वाघ शेपटी येथे खाडीकिनारी खाडीच्या पाण्यात अशोक जाधव यांचा बुडून मृत्यू झाल्याचे आढळले. दापोली पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.