तटरक्षक जवानाच्या प्रसंगावधानामुळे रत्नागिरीतील हॉटेलमध्ये आगीवर मिळविला ताबा

रत्नागिरी:- येथे रेल्वे स्टेशनजवळील हॉटेल राजभोग येथे दिनांक 24 जुलै रोजी रात्री अचानक लागलेल्या आगीवर तटरक्षक जवानाच्या प्रसंगावधानामुळे आगीवर ताबा मिळवता आला.राजभोग भोजनालयात सायकाळी जेवणासाठी तटरक्षक दलाचे जवान त्यांच्या परिवारसोबत जेवणासाठी गेले असता तेथे अचानक नऊ वाजेच्या सुमारास किचनमध्ये चिमणी पेटल्याने आग लागली आणि क्षणार्धातच आगीच्या ज्वाळा पहिल्या माळ्यावर असलेल्या भोजन क्षेत्रात देखील पोहचल्या. हॉटेलमधील लाकडी फर्निचर आणि सजावटीमुळे आग लवकर पसरली. यावेळी तटरक्षक दलाच्या जवानांनी आणि हॉटेल कर्मचार्‍यांनी हॉटेलमध्ये उपस्थित सर्वांना बाहेर काढले आणि तटरक्षक दलाच्या श्री हरदिप सिंह या अधिकार्‍याने प्रसंगावधान दाखवत आणि जिवाची पर्वा न करता तेथील पोर्टबल अग्निशामक एक्स्टिंग्यूशर हाती घेतले आणि संपूर्ण किचन मध्ये मोठ-मोठ्या आगीच्या ज्वालांना विझविण्यास सुरवात केली. किचन मधील सर्व गॅस सिलेंडर तेथून बाहेर काढले जेणेकरून आगीचा विस्फोट होऊ नये. त्यानंतर आगीवर ताबा मिळविण्यासाठी श्री हरदिप सिंह हे पहिल्या माळ्यावर चढले आग विझविण्याचे काम शर्थीने करू लागले. त्यातच त्यांनी एमआयडीसीच्या अग्निशामक दलाच्या कार्यालयास फोन केला. अग्निशामक दलाच्या आगमणापर्यंत श्री हरदिप सिंह यांनी आगीवर बहुतेक ताबा मिळविला होता. त्यानंतर अग्निशामक दलाने पूर्णत: आग बुझवली.
तटरक्षक दलाच्या श्री हरदिप सिंह यांच्यामुळे मोठ्या आगीमुळे ताबा मिळवून मोठी जीवित आणि वित्तहानी होण्यापासून वाचली. यामुळे ही आग लगतच्या इतर व्यावसायिक आणि रहिवाशी इमारतींना आगीचा मोठा प्रादुर्भाव होण्यापासून वाचविले. यामुळे श्री हरदिप सिंह यांच्या धाडसी कार्याचे उपस्थित सर्वच लोकांनी स्तुति केली.