शिवार आंबेर येथे प्रौढावर शिवीगाळ करत सुर्‍याने वार

रत्नागिरी:- तालुक्यातील शिवार आंबेरे-जाकादेवी फाटा येथे दारुच्या नशेत एकाने प्रौढाला शिवीगाळ करत सुर्‍याने वार केला. ही घटना मंगळवार 23 जुलै रोजी दुपारी 2.30 वा.सुमारास घडली.

विलास गोपाळ कांबळी (रा.शिवार आंबेरे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात योगेश दिनकर तिवरेकर (40, रा.रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी दुपारी फिर्यादी योगेश तिवरेकर हे शिवार आंबेरे-जाकादेवी फाटा येथे चायनिज गाळा सुरु करण्यासाठी त्यांचे मित्र सुनिल लाखण सोबत बोलत होते. तेव्हा संशयित विलास कांबळी दारु पिउन तिथे आला. त्यानंतर त्याने फिर्यादिला शिवागाळ करत त्याच्याजळील सुर्‍याने फिर्यादीच्या उजव्या गालावर वार करुन दुखापत केली. याप्रकरणी संशयिताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कमल 118 (1),352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.