मंगला एक्स्प्रेसमध्ये मोबाईलची चोरी

रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या मंगला एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरट्याने पळविला. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. २२) दुपारी एक च्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्टेशन दरम्यान घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नुबीन अशोक सुंदरन (वय २९, रा. अंडिकडू चेलेम्ब्रा पुलीपरम्बु, मल्लपूरम राज्य केरळ) हे हजरत निजामुद्दीन दिल्ली ते थिवीम असा मंगला एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना त्यांनी त्यांचा मोबाईल गाडीत चार्जिंगला लावून बाथरुमला गेले होते. या संधीचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्या मोबाईल पळविला. या प्रकरणी सुंदरन यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.