ग्रामीण भागातील अनधिकृत दारू विक्री पोलिसांच्या रडारवर

रत्नागिरी:- ग्रामीण व शहरी पोलिस दलाने पावसाळ्यात विनापरवाना हातभट्टी दारु विक्री व सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्याविरुद्ध कडक धोरण आखले आहे. मद्यपीसह मद्याची विक्री करणाऱ्यावर संकट ओढवले आहे. गेल्या काही महिन्यात प्रत्येक दिवशी सार्वजनिक ठिकाण मद्य प्राशन करणाऱ्यांची जशी संख्या वाढत आहेत तसेच ग्रामीण भागात आडोशाला गावठी दारु विक्रीचे प्रकार उघडकीस येत आहे. यावेळी चक्क रविवारीच्या दिवशी पोलिसांनी दारु विक्री व मद्य प्राशन यावर केलेल्या कारवाईचे जन सामन्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

ग्रामीण पोलिस ठाण्यातून रविवारी (ता. २१) बावनदी ते निवळी जाणाऱ्या रस्त्यालगत झाडी झुडपा गावठी दारु विक्री करणाऱ्यावर धाड टाकून ५ लिटर दारु जप्त केली. संशयित महेंद्र हरिश्चंद्र सांडीम (रा. तळेकांटे-सांडीमवाडी, रत्नागिरी) याच्याविरुद्ध तर खेडशी नाका येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱा संशयित अशोक गोपाळ पुनसकर (वय ५२, रा. खेडशी नाका रत्नागिरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी बेलबाग, मारुती मंदिर, थिबापॅलेस य़ेथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱे संशयित अजित यशवंत तळेकर, सुप्रभात रत्नकांत चव्हाण (रा. जुवेवाडी, रत्नागिरी), जयकुमार सुनिल साळवी ( रा. कोळंबे कुंभारवाडी, रत्नागिरी) तसेच सुधाकर कमलाकर मयेकर (रा. बेलबाग, रत्नागिरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल मंदार मोहिते, सहायक पोलिस फौजदार महेश टेमकर तर शहरी भागात पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे, पोलिस हेड कॉन्स्टेबल पंक पडेलकर, वैभव नार्वेकर, राहूल जाधव यांनी कारवाई करुन ग्रामीण व शहर पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या तक्रारीवरुन पोलिसांनी विनापरवाना मद्य विक्री व सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्यांविरुद्ध कडक धोरण आखले आहे.

तरुण प्रौढ यांच्या आरोग्यास हानिकारक असलेले गावठी मद्य, ब्राऊन शुगर, मटका जुगारीसारखे व्यवसाय राजरोस सुरु आहे. याची गोपनिय माहिती मिळवून पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये तरुणांचा समावेश जास्त असून ज्येष्ठ नागरिकांतर्फे पोलिसांच्या या कारवाईचे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.