चिपळुणात दुप्पट फायद्याचे आमिष दाखवून 10 लाखाची फसवणूक

चिपळूण:- फायनाशियल कंपनीत पैसे गुंतवल्यास त्याचा दुप्पट फायदा होईल असे आमिष दाखवून यातूनच एकाची तब्बल 10 लाखाला फसवणूक केल्याचा प्रकार 2020 ते 21 या कालावधीत घडला. फसवणूक करणाऱ्यावर चिपळूण पोलिस स्थानकात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अयुब अहमद परकार (कालुस्ते खुर्द) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद दिलनवाज करामत बेबल (44, चिपळूण) यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अयुब परकार याने दिलनवाज बेबल यांना 2020 ते 2021 या कालवाधीत वेळोवेळी एच.आर.र्क्लड फायनाशियल सर्व्हिस आणि युरो लिंक व्हेन्चर या कंपन्यामध्ये पैसे गुंतवून त्याचा दुप्पट फायदा मिळवून देतो असे आमिष दाखवले. त्यासाठी परकार याने बेबल याचे वेळोवेळी असे एकूण 10 लाख घेतले. तसेच ही रक्कम त्यांना परत केलेली नाही. हा प्रकार बेबल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी चिपळूण तक्रार दाखल केली. त्यानुसार परकार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.