खेड तालुक्यातील चोरद, नारिंगी, जगबुडी नद्यांना पूर

खेड:- खेड तालुक्यामध्ये शनिवार पहाटे पासून आभाळ फाटल्यागत पावसाने मुसळधार कोसळत राहिल्ल्याने लावल्याने दुपार पर्यंत पावसाने आपला जोर कायम ठेवला होता. पावसा मुळे शहरासह ग्रामीण भागाचा संपर्क तूटून जनजीवन विस्कळीत झाले चोरद, नारिंगी, जगबुडी या नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पूर परीस्थिती निर्माण झाली. जगबुडी नदीला आलेल्या पुरामुळे नदीचे पाणी खेड बाजार पेठेत सुरुवात झाल्याने खेड मध्ये पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे

गेल्या दोन दिवसा पासून पाउस मुसळधार कोसळत आहे त्या मूळे खेड मधे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली होती . सकाळी १० वाजे पर्यंत चोरद, नारिंगी व जगबुडी नदयांनी धोक्याची पातळी ओलांडण्यास सुरुवात केली. त्यामुळे सर्वच नद्यांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ होवून नद्यांना पूर आला. या मुळे जन जीवन झाले. पहाटे पासून सलग कोसळलेल्या पावसाने सखल भागात पाणी शिरल्याने रस्ते जलमय होत ग्रामीण भाग देखील पुराने प्रावित होत संपर्कहीन झाला.

खेड बाजार पेठेत पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात, व्यापाऱ्यानी साहित्य हलवले

पहाटे पासूनच सरीवर सरी कोसळणाऱ्या पावसाने जगबुडी नदीला आलेल्या पुराचे पाणी नदी पात्रातील पाणी येथील बाजार पेठेत शिरल्याने बाजार पेठ पाण्या खाली जाण्यास सुरुवात झाली. मुसळधार कोसळत असलेल्या पावसाने व्यापारी वगार्ची एकच तारांबळ उडाली. ट्रक टेम्पो आदीच्या सहायाने दुकानातील साहित्य बाहेर काढण्यास सुरुवात केली. पावसाने उग्र रूप धरण केल्याने नगर परीषदेकडून शहरात पाणी शिरल्याचे भोंगे वाजवून सूचित करण्यात आले. तसेच सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या.

शहरातील साठे, पोत्रीक मोहल्ला येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. तर मुख्य बाजार पेठे तील गांधी चौक,वाळकी, आदी परिसरात पुराचे पाणी शिरले होते. खेड दापोली मार्गावर या ठिकाणी नारिंगी नदीचे पुराचे पाणी शिरल्याने येथील मार्ग ठप्प झाल. त्याच बरोबर शहरातील कुंवार साई, देवणे आदी परिसर पूर्णता पाण्या खाली गेला होता. पावसाच्या उग्र रूपा मुळे नगर परिषद प्रशासनाने निर्माण झालेल्या आपत्तीवर मात करण्या साठी बाहेर पडून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.