अपघातप्रकरणी जीप चालकावर गुन्हा दाखल

खेड:- तालुक्यातील रघुवीर घाट येथे जीपने दुचाकीला समोरून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघेजण जखमी झाल्याची घटना ७ जुलै रोजी घडली होती . या प्रकरणी १७ रोजी जीप चालकावर येथील पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहील सचिन कदम वय ३२ असे गुन्हा दाखल झालेल्या जीप चालकाचे नाव आहे . या प्रकरणी अक्षय किशोर कानडे वय – ३८ यांनी येथील पोलिस स्थानकात तक्रार दिली होती . यातील जखमी मानस किशोर कानडे हा त्याचे ताब्यातील ज्युपिटर गाडी क्रमांक ( एम.एच .०८ बी . डी ३१२९ ) वर पाठीमागील सीटवर पुतण्या मांश , वहिनी मनिषा यांना बसवून खोपी रघुवीर घाट चढत असताना एका वळणाचे रस्त्यावर समोरुन येणारे जीप वरील चालक साहील सचिन कदम याने त्याचे ताब्यातील वाहनाने धडक देऊन अपघात केला होता . यामध्ये मानस किशोर कानडे याचे शरीराचे उजवे बरगडीचे व उजवे पायाचे मांडीला गंभीर दुखापतीस तसेच वहीनी मनिषा व पुतण्या मांश यांचे किरकोळ दुखापतीस व ज्युपिटर गाडीचे नुकसानीस कारणीभुत झाला म्हणुन गुन्हा दाखल झाला आहे .