कोकण रेल्वे पुन्हा ठप्प; दिवाण खवटीनजिक रुळावर माती

खेड:- गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पडत असलेल्या पावसाने खेड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याला झोडपले असून कोकण रेल्वे देखील या मुसळधार पावसाने बाधित झाली आहे. खेड नजीक दिवाण खवटी (नातूनगर टनेल) नजीक बोगदया नजीक मातीचा भराव रेल्वे रुळावर आल्याने कोकण रेल्वे पुन्हा ठप्प झाली आहे.

काही दिवसापूर्वी पेडणे बोगदामध्ये पाणी साचल्याने कोकण रेल्वे ठप्प झाली होती यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक पूर्णता कोलमडून गेल्याने अनेक गाड्या उशिरा धावत होत्या मात्र रविवारी पुन्हा एकदा कोकण रेल्वे ठप्प झाली आहे दिवाणखवटी बोगद्या नजीक मातीचा भराव रेल्वे रुळावर आल्याने अनेक गाड्या जास्त स्थानकात आहेत त्या स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत

दरम्यान रुळावर आलेले मातीचा भराव काढण्याचे काम युद्धपातळी वर घेऊन मार्ग वाहतुकीस खुला करण्यात येईल असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले