रत्नागिरी:- पाचल (ता. राजापूर) येथील अल्पवयीन मुलगा पबजी गेम खेळत होता. त्यावरुन त्याचे वडिलांना धाक दिला. या रागातून त्याने आत्महत्या करण्याचा प्रय़त्न केला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या उपचार सुरु आहेत. तेजस सत्यवान गुरव (वय १८, रा. पाचल, राजापूर) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ९) सकाळी दहाच्या सुमारास पाचल येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार तेजसला मोबाईलवर पबजी गेम खेळण्याचा नाद लागला होता म्हणून वडिलांनी कामावर जाता-जाता गेम खेळू नकोस असे सांगितले. याचा राग मनात धरुन तेजसने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. घरातील मंडळीनी त्याची तात्काळ सोडवणूक केली. उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.