शिवाजी स्टेडियम येथे बाप-लेकांना मारहाण, गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील शिवाजी स्टेडियम येथे भांडण शमविण्यासाठी गेलेल्या मुलगा व वडिलांना संशयितांनी मारहाण व दुखापत केली. या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. प्रणय सोनवणे व त्यांचा भाऊ (रा. शिवाजी स्टेडियम, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना गुरुवारी (ता. ४) रात्री पावणे आठच्या सुमारास शिवाजी स्टेडियम येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुभम उमेश कर्लेकर (वय २५, रा. इंद्रप्रस्थ अपार्टमेंट, कर्लेकरवाडी, रत्नागिरी) हे व त्यांचे वडिल शुभम व संशयित प्रणय यांच्यात झालेल्या भांडणाबद्दल समजाविण्यास गेले होते. त्यावेळी संशयितांनी शुभम यांच्या वडिलांना लाकडी काठीने मारहाण केली तर शुभम यांच्या डावे हाताला दुखापत केली. तर संशयिताच्या भावाने शुभम कर्लेकर यांच्या वडिलांना स्टेडियम वरुन खाली ढकलून दिले त्यामुळे त्यांच्या डोक्याला व हाताला मार लागला. या प्रकरणी शुभम कर्लेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.