रेल्वे चोरीतील १८ तोळे सोन्यापैकी १३ तोळे सोने हस्तगत करण्यात शहर पोलिसांना आले यश

रत्नागिरी:- तांत्रिक तपासाची कमाल आणि पोलिसांचे तपास कामातील सातत्य यामुळे अनेकदा अशक्यप्राय असलेली रेल्वेतील चोरी उघडकीस येऊन चोरटा जेरबंद तर झालाच परंतु चोरीस गेलेल्या १८ तोळे सोन्यापैकी १३ तोळे सोने जप्त करण्यातही रत्नागिरी पोलिसांना यश आले. महिलेच्या बॅगमधून सोने चोरण्याची ही घटना २६ मे २०२४ ला रेल्वेत घडली होती. ही कारवाई शहर पोलिसांतील गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या पोलिसांनी केली.

रेल्वेत चोरी करुन पसार झालेल्या आरोपीला पकडण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या खबऱ्यांच्या संपर्कात आल्याने हा चोरटा पोलिसांच्या तावडीत सापडला. ही कारवाई
ही घटना २६ मे २०२४ ला रेल्वेत घडली होती.

अन्नमा जोसफ (५६, रा. केरळ, सध्या रा. डोंबिवली) हे केरळ ते मुंबई प्रवास करत होते. त्यांना कोकण रेल्वे मार्गावरिल आडवली ते रत्नागिरी दरम्यान झोप लागली. त्याचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांची बॅग व १८ तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. जोसेफ यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर एक महिन्यानंतर पोलिसांनी चोरट्याला पकडले. प्रसाद जगन्नाथ पाटील ( ३०, रा. भेरसे, अलिबाग, रायगड) असे चोरट्याचे नाव आहे. शहर पोलिसांतील गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या पोलिसांनी केली. प्रसाद पाटील याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा वापर केला. प्रसाद पाटील कुठे कसा गेला याचा ट्रेस सुरु असताना एका एटीएम मध्ये पैसे काढत असताना त्याचा पूर्ण चेहरा समोर आला. त्यानंतर शहर पोलिसांनी शुक्रवारी २८ जुन रोजी पहाटे मडगाव येथून त्याला अटक केली होती.

प्रसाद ला अटक केलानंतर त्याने चोरलेले सोने कुठे नेले याचा तपास करताना ते सोने अलिबाग येथील अरुण जनबा घोटणे याला विकल्याची माहिती पुढे आली . त्यानंतर पोलिसांनी अरुण घोटणे यालाही ताब्यात घेऊन त्याच्याकडून १८ तोळे पैकी १३ तोळे सोने जप्त करण्यात यश मिळवले.

अनेकदा रेल्वेमधील चोऱ्या उघडकीस येत नाहीत. चोरी एकीकडे होते तर त्याची तक्रार दुसर्या गावातील पोलीस स्थानकात होते. रेल्वे प्रवास दरम्यान चोरट्याचा माग काढणे सोपे नसते. मात्र रत्नागिरी शहर पोलीस स्थानकातील गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या पोलिसांनी कमाल करत हो चोरी उघडकीस आणलीच परंतु दोन मुख्य संशयिताना जेरबंद करतानाच मुद्देमाल सुद्धा जप्त केला. ही कामगिरी शहर पोलिस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षातील पोलिस उपनिरीक्षक श्याम आरमळकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक दिपक साळवी, पोलिस हवालदार अरुण चाळके, राहूल जाधव, अमोल भोसले, पोलिस नाईक पंकज पडेलकर, आशिष भालेकर, भालचंद्र मयेकर पोलिस शिपाई अमित पालवे यांनी केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक श्याम आरमळकर करीत आहेत.