राजापूर:- राजापूर तालुक्यातील मूर गावात असलेल्या कोकण तडका या बार आणि रेस्टॉरंटमध्ये कार्यरत असलेल्या दीपक दामोदर सुतार राहणार मूर- सुतारवाडी (वय 42) या कर्मचाऱ्याचे विजेचा झटका लागून मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. सदर घटना मूर येथील कोकण तडका या बार आणि रेस्टोरंट असलेल्या हॉटेलमध्ये घडली.
सदर घटना घडल्यानंतर नातेवाईकांनी त्या तरुणाला ग्रामस्थांच्या मदतीने रायपाटण ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. सदरच्या घटनेबाबत जवळच असलेले पोलीस दूरक्षेत्र रायपाटण चे पोलीस हेडकॉस्टेबल कमलाकर तळेकर, भीम कोळी, स्वप्नील घाडगे रायपाटण रुग्णालय येथे दाखल झाले असून पुढील तपास चालू आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.