राजापूरातून २८ वर्षीय विवाहिता बेपत्ता

राजापूर:-बाजारात जाऊन येते असे सांगून घरातून बाहेर पडलेली शहरातील बंगलवाडी येथील सौ. स्वरा सचीन धुरी (वय २८) ही दिनांक 2 जून २०२४ पासून बेपत्ता असून राजापूर पोलीस ठाण्यात तशी नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजापूर शहर बंगलवाडी मधील सौ स्वरा सचीन धुरी ही दिनांक २ जून २०२४ ला बाजारात जाते असे सांगून बाहेर पडली होती. मात्र नंतर ती घरी परतली नव्हती. तिच्या घरच्यांनी इतरत्र शोधाशोध घेतली असताती सापडली नव्हती. अखेर स्वराचे पती सचीन नंदकुमार धुरी यांनी राजापूर पोलीस ठाण्यात नोंद केली. याबाबत राजापूर पोलीस ठाण्याचे हेडकॉस्टेबल अनंत तिवरेकर हे अधिक तपास करीत असून सदर महिला कुठे आढळून आल्यास राजापूर पोलीस ठाणे (०२३५३-२२२०३३) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन राजापूर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल अनंत तिवडेकर यांनी केले आहे.