रत्नागिरी:- येथील बी-टेक इंजिनिअरिंग कॉलेजमधील दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचा सोमवारी वैश्विक मानवी मुल्य या विषयाच्या पेपरमध्ये झालेल्या गोंधळामुळे एक तासातच प्रश्नपत्रिका बदलण्याची वेळ प्रशासनावर आली. विद्यापिठाकडून कळवण्यात आल्यामुळे पेपर बदलत असल्याचे सांगण्यात आले. एक तासाने पुन्हा पेपर सोडविण्यास दिल्यामुळे मुलांचा गोंधळ उडाला होता. याला विद्यापिठाकडूनही दुजोरा मिळाला आहे. या गंभीर प्रकाराबाबत ठाकरे युवासेनेचे तालुका प्रमुख प्रसाद सावंत यांनी आवाज उठवला असून याची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
रत्नागिरीतील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये यंदाच्या शैक्षणिक सत्रातील अखेरची परिक्षा सुरु आहे. आज वैश्घवक मानवी मुल्य 2 हा पेपर होता. दुपारी दोन वाजता हा पेपर सुरु झाला. त्यानंतर एक तासांनी तो काढून घेण्यात आला. अचानक पेपर काढून घेण्यात आल्यामुळे विद्यार्थी नाराज झाले होते. काहींनी याबाबत प्राध्यापकांकडे नाराजीही व्यक्त केली. परंतु प्राध्यापकांनी विद्यापिठाकडूनच सुचना आल्याचे सांगत त्यांना पुन्हा पेपर द्या असे सांगितले.
पेपर बदल करण्याच्या सुचना विद्यापिठाकडून प्राचार्याना दुपारी 3 वाजता मिळाली, तेही व्हॉट्स घ्प वर. जर प्राचार्यांनी वेळेत सूचना पाहिली नसती तर अधिक गोंधळ उडाला असता. यानंतर नव्याने आलेल्या पेपरच्या प्रिंट काढून त्या मुलांना देण्यात आल्या. हा पेपर सोडविण्यासाठी मुलांना तीन तासाचा वेळ दिला गेला होता. त्यामुळे पाच वाजता सुटणारा पेपर सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुरु होता. सुरवातीच्या एक तास सोडविलेला पेपर काढून घेतल्यामुळे विद्यार्थ्यांची मेहनत वाया गेली.
हा प्रकार समजल्यानंतर ठाकरे युवा सेनेचे तालुका युवािधकारी प्रसाद सावंत यांनी कॉलेज कक्षप्रमुख पारस साखरे, साहिल झोरे यांच्या समवेत कॉलेजचे प्राचार्य यु. व्ही. पाटील यांची भेट घेतली. तसेच झालेल्या प्रकाराबाबत चौकशी करावी अशी मागणी केली.यामध्ये विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागल्याचे श्री. सावंत यांनी सांगितले. हा पेपर आपल्या अभ्यासक्रमात नसून याचे वेळापत्रक आम्हाला दोन दिवसांपूर्वी आल्याची कैफियत विद्यार्थ्यांनी प्रसाद सावंत यांच्यासमोर मांडली. या प्रकरणाबाबत प्राचार्य पाटील यांच्याशी संपर्क साधला असता पेपर बदलण्यात आला असल्याचे सांगितले. मात्र या परिक्षेचा विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षातील प्रवेशावर कोणताही परिणाम होणार नसल्याची ग्वाही दिली.