जिल्ह्यात उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार: ना. सामंत

रत्नागिरी:- राज्य शासनाकडून नुकत्याच सादर करण्यात आलेल्या लाडकी बहिणी योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आह़े. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यता येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले अधिक जलद गतिने उपलब्ध होण्यासाठी जिल्हा पशासनाकडून स्वतंत्र यंत्रणा उभारणार असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केल़ी.

अर्थसंकल्पाबाबत विरोधकांकडून करण्यात आलेल्या टिकेला देखील मंत्री उदय सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल़े. अर्थसंकल्पामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आह़े. महिला, युवा व शेतकरी यांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आह़े. तसेच कापुस, सोयाबीन दुधउत्पादक शेतकरी यांना देखील चांगले दिवस या अर्थसंकल्पामुळे येणार आहेत़. राज्याच्या 17 शहरांमध्ये महिलांसाठी पिंक रिक्षा योजना, शेतकऱयांना कृषीशेती पंप वीजबील माफ करणे आदी कारणांमुळे सर्वांना लाभदायी असा अर्थसंकल्प ठरणार आह़े. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता विरोधकांना पुढचे 25 वर्षे त्यांना विरोधात बसवतील असा टोला सामंत यांनी विरोधकांना लगावला.

जिल्हा नियोजन मंडळातून घेतलेले अनेक निर्णय आज राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहेत़. त्यामध्ये शासकीय इमारतींना सोलर पॅनल बसविण्याचा निर्णय इतर ठिकाणीही घेतला जात आह़े. तसेच जिल्ह्यातून अमेरिकेतील नासा येथे विद्यार्थ्यांना पाठविण्याचा निर्णय घेतला होत़ा. यावर्षी मागील वर्षीपेक्षा दुप्पट मुलांना नासा येथे पाठविण्यात येणार आह़े. जिह्यातील उपकमांचे कौतुक राज्यातील इतर नेत्यांकडून करण्यात येत असल्याचे सामत यांनी यावेळी सांगितल़े.

शासनाच्या पिंक रिक्षा योजनेसाठी एकूण 80 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होत़ी तर लाकडी बहिण योजनेसाठी 46 हजार कोटी रूपये देण्यात आले आहेत़. मुलींच्या लग्नासाठीची रक्कम 10 हजार रूपयांवरून 25 हजार तर बचत गटातील महिलांना मिळणारे 15 हजार रूपये आता 30 हजार रूपयांपर्यंत वाढविण्यात आले. आहेत़. महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन काम करत असून येत्या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे सामंत यांनी सांगितल़े.

मुंलीच्या एसटी पास ओळखपत्र व अर्जाच्या खर्चाचा भार उचलणार
एसटी महामंडळाकडून पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थीनींना अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना राबविली जात़े. मात्र या मुलींकडून अर्ज व ओळखपत्रांचे पैसे घेतले जातात़. आता मुलींना हे पैसे देखील द्यावे लागणार नाहीत. जिल्ह्यातील 70 हजार 580 मुलींच्या ओळखपत्र व अर्जाचे पैसे श्री रत्नागिरीचा राजा मंडळाच्या माध्यमातून उचलण्यात येणार आह़ त्यामुळे मुलींना त्यांच्या शाळेत मोफत पास दिले जातील असे सामंत यांनी सांगितल़े.