कोंडसर येथे मासेमारीसाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

राजापूर:- तालुक्यातील कोंडसर येथील खाडीत मासेमारीसाठी गेलेल्या दोघा पौढांचा खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. सोमवारी दुपारी बुडालेल्या दोघांचेही मृतदेह सापडले. सुनिल केशव घाणेकर (58) व संदिप केशव मोगरकर (45) अशी मृतांची नावे आहेत.    

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील कोंडसर बु. येथील संदीप मोगरकर, सुनिल घाणेकर, दिपक मोगरकर, तुकाराम घाणेकर असे चौघेजण रविवारी सायंकाळी कोंडसर बुद्रुक बंधाऱया नजीकच्या खाडीपात्रात मासेमारीसाठी गेले होते. यावेळी मयत सुनिल केशव घाणेकर हे मासे पकडण्याचे जाळे सोडण्यासाठी खाडीपात्रामध्ये उतरले. मात्र त्यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. ही बाब किनाऱयावरील सोबत गेलेल्या अन्य तिघंच्या लक्षात येताच त्यापैकी संदीप मोगरकर हे त्यांना वाचविण्यासाठी खाडीपात्रामध्ये उतरले. मात्र दुर्दैवाने दोघेही पाण्यात बुडले.  

दरम्यान किनाऱयावर असलेल्या अन्य दोघांपैकी एकाने खाडीपात्रामध्ये उतरून त्या दोघांनाही वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निष्फळ ठरला. या दुर्घटनेची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांसह परिसरातील गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेत बुडालेल्यांचा खाडीपात्रामध्ये शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, जोराचा पाऊस आणि रात्रीचा काळोख यामुळे शोध घेण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे रात्री शोध मोहिम थांबविण्यात आली.   

त्यानंतर सोमवारी सकाळपासून पून्हा बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यात आला. दरम्यान दुपाच्या सुमारास ज्या ठिकाणी दोघे बुडाले होते. त्याच ठिकाणी दोघांचे मृतदेह आढळून आले. याबाबतची माहिती मिळताच नाटे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदारी यांच्यासह त्यांचे सहकारी श्री.पिलणकर, श्री.चव्हाण, कुशल हासिकर आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. दरम्यान मंडल अधिकारी श्री.शेवाळे, तलाठी श्री.गोरे, ग्रामविकास अधिकारी अनिल पिठलेकर यांनी देखील घटनास्थळी जावून शोधकार्यात मदत केली.  

दरम्यान कोंडसर खाडीत दोघेजण बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) तालुकाध्यक्ष दिपक नागले यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी जात शोधकार्यात मदत केली. यामध्ये अŸड.समीर कुंटे, घनशाम तळये, प्रसाद घाणेकर, संतोष रोकडे, संदेश पाटील, भाई फणसे, पसाद परांजपे, रवी मोगरकर, संकेश मोगरकर, श्रीकृष्ण घाणेकर, गंगाराम चिपटे, सखाराम भालवलकर, नारायण दावडे, भास्कर माटल, भिकाजी पुंभार, जयेंद्र शेडेकर, योगेश दावडे, सुरेंद्र तळये, विकम दळवी, सुर्यकांत चिपटे, संतोष पांचाळ, पमोद वारीक, दिलीप वारीक, किरण जोशी, अजित दावडे, रविंद्र दावडे, बाळ दाते, कृष्णा दावडे, राकेश दावडे, सुधाकर मोगरकर यांचा सहभाग होता. या दुर्घटनेमुळे कोण सर बुद्रुक परिसरात शोक कळा पसरली आहे.