शीळ नदीपात्रात टाकलेले जलवाहिनीचे पाईप गेले वाहून

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱया शीळ धरण ते जॅकवेलपर्यंताया जलवाहिनो रखडलेले काम पावसाळय़ापूर्वी पूर्ण करण्यासाठी युध्दपातळीवर काम सुरू आहे. मात्र हे काम अजूनही रखडलेल्या अवस्थेत आहे. एकूण 550 मीटरी ही जलवाहिनी असून ते काम मार्गी लावत असताना आता नदीपात्रातून टाकण्यात आलेल्या जलवाहिनीचे पाईप पावसामुळे नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे वाहून जाण्याची नामुष्की ओढवली आहे.

न.प. हद्दीत गेल्या उन्हाळय़ात पाण्याची टंचाई सुरू होती. शहरवासियांना शीळ धरणातील खालावलेल्या पाणीसाठय़ामुळे एकदिवस आड पाणीपुरवठा सुरु करण्यात आलेला होता. शीळ धरण ते पंपिंग हाऊसपर्यंत पाईपलाईन टाकण्यास झालेल्या विलंबाबाबत ओरड सुरू असताना धरण ते जॅकवेल पर्यंत जलवाहिनी जोडण्याच्या कामाला गती देण्यात आली होती. नळपाणी योजना पूर्ण झाली असताना पंपिंग हाऊसपर्यंत लाईन पूर्ण होणे आवश्यक आहे. हे काम पावसाळ्य़ापूर्वी तातडीने करण्यात यावे यासाठी न.प.प्रशासनो प्रयत्न सुरू होते.

त्यासाठी कलकत्त्याहून पाईप मागवण्यात आले होते. पण हे काम तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जात होता. कामही अंतिम टप्प्यात आलेले होते. काही जाँईंट आणि पाईप पुन्हा कमी पडल्याने ते कलकत्त्याहून मागवावे लागले आहेत. त्यामुळे या कामात पुन्हा व्यत्यय आला आहे. अशावेळी आता जोरदार सुरू झालेल्या पावसामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह देखील कमाल वाढला आहे. त्या प्रवाहामुळे नदीपात्रातून टाकलेले पाईप वाहण्या प्रकार घडला आहे. त्यामुळे न.प. प्रशासनासमोर या कामात पुन्हा एकदा नामुष्की ओढवली आहे.