कोकण पदवीधर मतदारसंघातून रमेश कीर यांचे पारडे जड

Canon Inc

रत्नागिरी:- आज 26 रोजी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. निवडणुकीचा प्रचार करताना सर्वच उमेदवारांचा कस लागत असल्याचे दिसून येत आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील पदवीधर निवडणुकीत तब्बल 13 उमेदवार उभे असून 12 वर्षे आमदार असलेल्या ॲड.निरंजन डावखरे यांच्यापुढे त्यांचे आव्हान असले तरी थेट लढत ही महाविकास आघाडीचे काँग्रेसचे माजी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रमेश कीर विरूद्ध ॲड.निरंजन डावखरे यांच्यात दिसत आहे. दरम्यान, सर्वाधिक मतदार हे ठाणे परिसरात असल्याने डावखरेंची बाजू काहीशी मजबूत समजली जात असली तरी अनेकांनी महायुतीला नाकारल्याने त्याचा प्रभाव या निवडणुकीवर पडेल की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. यामुळे कोकण म्हाडाचे माजी सभापती व शिक्षण क्षेत्रासह औद्योगिक क्षेत्रात ज्यांच्या नावाचा दबदबा आहे. तसेच निष्कलंक, कार्यशील, अभ्यासू, विधीज्ञ उमेदवार रमेश कीर यांच्या समोर कोणीही उमेदवार टिकेल असे वाटत नाही. नावाचे आमदार होण्यापेक्षा दमदार व कामदार असे पदवीधरांचे आमदार होण्याचे उद्दीष्ट मनाशी बाळगलेले व ही निवडणूक मी बेरोजगार, शिक्षक यांच्यासाठी लढतोय, असे भावनिक आवाहन करणारे रमेश कीर निवडून येणार असा विश्वास कोकण मतदारसंघात दिसून येत आहे.

निवडणुकीचा प्रचार करताना सर्वच उमेदवारांचा कस लागत असल्याचे दिसून येत आहे. कोकण मतदारसंघाचे विस्तीर्ण क्षेत्र आणि विखुरलेले मतदार यामुळे मतदारांपर्यंत पोहोचणे आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळे उमेदवारांनी
मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पत्रप्रपंचाचा आधार घेतला जात आहे. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी 13 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र प्रमुख लढत ही भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात होणे अपेक्षित आहे. या मतदारसंघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. यंदा मतदारसंघासाठी सुमारे 2 लाख 23 हजार 222 मतदारांची नोंदणी झाली आहे. गेल्या वेळेसच्या तुलनेत यंदा 1 लाख 20 हजार अधिक मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे 2 लाख 23 हजार मतदारांपर्यंत पोहोचणे सर्वच उमेदवारांसाठी आव्हानात्मक ठरले आहे.
मतदारसंघाचे विस्तीर्ण क्षेत्र आणि विखुरलेले मतदार यामुळे सर्वच मतदारांपर्यंत पोहोचणे आव्हानात्मक ठरले आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीप्रमाणे प्रत्येक गावात जाऊन प्रचार करणे अशक्य असल्याने उमेदवारांनी पत्राद्वारे मतदारांशी संवाद साधण्याचे प्रयत्न केले आहेत. निरंजन डावखरे यांनी प्रचाराच्या सुरवातीच्या टप्प्यात सहा वर्षांतील कार्य अहवाल प्रत्येक मतदाराला पोस्टाने पाठवला. यानंतर शेवटच्या टप्प्यात पत्राद्वारे पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन केले.

काँग्रेसचे रमेश कीर यांनीही पोस्टाच्या माध्यमातून मतदारांशी थेट पत्रव्यवहार केला. कोकण आणि कोकण हितासाठी आजवर काम करत आलो आहे. यापुढेही काम करण्याची संधी द्या अशी साद घातली आहे. शिक्षक, पदवीधर आणि बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करीन अशी ग्वाही त्यांनी या माध्यमातून दिली आहे.

दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या या पत्रप्रपांचामुळे पोस्टाचे काम वाढले आहे. पदवीधर मतदारांचे पत्ते शोधून पत्र पोहोचवण्याचे काम पोस्टमन करत आहेत. या निमित्ताने त्यांच्या कामावरचा ताणही काहीसा वाढला आहे. ई-मेल, व्हॉट्सॲपच्या, फेसबुक, ट्विटरच्या जमान्यात, पत्रव्यवहाराचा वापर आणि महत्व खूपच कमी झाले आहे. मात्र पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांपर्यंत पोहोचण्याचे सर्वात विश्वासार्ह माध्यम असे महत्व आले आहे. त्यामुळे दोन्ही पत्रव्यवहारांना पसंती दिल्याचे या निमित्ताने पहायला मिळत आहे.
जिल्हानिहाय मतदारांची आकडेवारी :-पालघर 28 हजार 925, ठाणे 98 हजार 860, रायगड 54 हजार 208, रत्नागिरी 22 हजार 681, सिंधुदुर्ग 18 हजार 548.