रत्नागिरी:- चालू शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून राज्यातील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या सर्व शाळा सकाळी नऊनंतर भरावाव्यात, याबाबतचा अध्यादेश शासनाने फेब्रुवारी 2013 मध्ये काढला होता. त्यानुसार यापासून काही शाळांनी वेळ बदललेली असली, तरी दोन सत्रांत भरणार्या शाळांपुढे वेळ बदलणे गैरसोयीचे ठरत आहे, तर काही शाळांनी पूर्वीच्या वेळेप्रमाणेच शाळा भरविण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्या शैक्षणिक वर्षाला 15 जूनपासून सुरुवात झाली आहे. सकाळी मुलांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी पालक वर्गातून करण्यात येत होत्या. यासाठी सकाळ सत्रातील शाळा 9 वाजल्यानंतर भरवाव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे शासनाने देखील प्राथमिक शाळांची वेळ 9 वाजता करावी, असे आदेश दिले आहेत.
या निर्णयामुळे काही पालक व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी या निर्णयाची अंमलबजावणी करताना काही शाळा, पालक, विद्यार्थी, तसेच विद्यार्थी बस वाहतूक करणारे यांच्या काही अडचणी उभ्या आहेत. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी शंभर टक्के होणे अवघड आहे.
शहरात सीबीएसई आणि कॉन्व्हेंट स्कूल आणि जिल्हा परिषद, महापालिका व खासगी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा एकाच सत्रात भरतात त्यांना शासनाच्या निर्णयानसार वेळ पाळणे शक्य होणार आहे; खासगी शाळा दोन सत्रामध्ये भरतात त्यांच्या भौतिक सुविधांचा विचार करता त्यांच्यापुढे शाळांची वेळ बदलणे हे गैरसोयीचे ठरू शकते. आहे. कारण ज्या शाळांना वेळेत बदल करणे शक्य होणार नाही अशा शाळांनी संबंधित शिक्षणाधिकारी यांच्याशी विचार विनिमय करुन निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे.