राजापूर:- राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील सहकारी संस्थेच्या ताब्यात असलेले कोट्यवधी रुपयाचे सोने चोरीस गेल्यानंतर पोलीस खात्याने जोरदार तपास सुरु केला आहे. याचवेळी राजापूर तालुक्यात विविध सहकारी संस्थांनी १७ कोटी रुपयांचे कर्जवाटप सोनेतारणापोटी केल्याचे पुढे आले आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, राजापूर तालुक्यात विविध पतसंस्थांच्या १२ शाखा आहेत. राजापूर शहरातच नव्हे तर ग्रामीण क्षेत्रात पतसंस्थांच्या शाखा आहेत कर्ज वितरित केले जाते.
सभासदांकडून तारण म्हणून घेतलेल्या सोन्याची जबाबदारी पतसंस्थेवर येऊन पडते. योग्य तो बंदोबस्त ठेवून सोने ठेवण्यात येते. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या सूचनेवरुन पतसंस्थांनी या शाखांमधून सोनेतारण करण्यात येते. सोन्याच्या किंमतीच्या प्रमाणात कर्ज रक्कम ठरवण्यात येते. सभासदांच्या गरजेप्रमाणे नियमाच्या आधिन राहून वितरण सोन्याच्या रखवालीविषयी अधिक काळजीपूर्वक पावले टाकली आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांसाठी दिलेल्या निकषांप्रमाणे पतसंस्थांनीही उपाययोजना म्हणून असे आवाहन करण्यात आले होते. त्याप्रमाणे पतसंस्थांनी आपल्या कारभारात सुधारणा केली. या पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्यात सोनेतारणासाठी १७ कोटी रुपयाचे वितरण केले आहे. अर्थातच यापेक्षा अधिक किंमतीचे सोने पतसंस्थांनी ताब्यात ठेवले आहे. चोरी प्रकरणानंतर सोनेतारणाचा मुद्दा अधिक चर्चेचा झाला होता.