कुवारबाव-आरटीओ रस्त्यावर चायनीज गाडीवर तिघांकडून एकाला मारहाण

रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव-आरटीओ रस्त्यावर असलेल्या एका चायनीज गाडीवर राडा झाल्याची घटना घडली आहे. या राड्यात एकाला दुखापत झाली असून शहर पोलिस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर संजय यादव (रा. म्हाडा कॉलनी, कुवारबाव-रत्नागिरी), आर्यन संदिप पवार (रा. खांबकर स्टॉप, कारवांचीवाडी, रत्नागिरी) आणि सुबोध विलास बेटकर (रा. पारसनगर, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना मंगळवारी (ता. १८) रात्री साडेसातच्या सुमारास कुवारबाव येथील आरटीओ रस्त्यावरील शुभम चायनीज सेन्टर येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचा भाऊ हे दोघे शुभम चायनिज येथे काम करत असताना कारवांचीवाडी येथे राहणारे संशयित यांना येथे मद्य प्राशन करुन नका सांगितले. पण ते तिघे आधीच मद्य प्राशन करुन आले होते. फिर्यादी हे पुन्हा त्यांना समजावित असताना संशयित सागर व आर्यन याने मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी फिर्यादी यांचा भाऊ खेमुसा हा सोडविण्यासाठी गेला असता उभ्या असलेला संशयित सुबोध याने मारहाण केली. हाणामारी सुरु असताना संशयित सागर याने दगड घेऊन फिर्यादी यांच्या हनुवटीवर मारुन दुखापत केली. यामध्ये छत्रसाई ललीतसाई ठाकूर (वय २८, रा. हेमप्रभा बिल्डींग कुवारबाव-रत्नागिरी) हा जखमी झाला. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली तक्रारीवरुन पोलिसांनी तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.