घराच्या माळ्यावरून पडून तरूणाचा मृत्यू

गुहागर:- तालुक्यातील कोळवली भुवडवाडी येथे घराच्या माळ्यावर चढून काम करीत असताना तरूणाचा तोल जाऊन तो खाली पडल्यानें यामध्येच त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी १२.४५ वाजता घडली.

राहुल दत्ताराम भुवड (वय ३५) असे मृत तरूणाचे नाव आहे. राहुल मंगळवारी आपल्या घराच्या माळ्यावर काम करण्यासाठी चढला होता. त्यावेळी त्याचा तोल जाऊन खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तातडीने घरातीलच अनिल शंकर भुवड यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कोळवली येथे दाखल केले. मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता तो मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेची नोंद गुहागर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.