रत्नागिरीतील समुपदेशन प्रक्रियेत 1 हजार 16 शिक्षकांना नियुक्तीपत्र

रत्नागिरी:- जिल्ह्य़ातील नव्या शिक्षक भरतीसाठी पवित्र प्रणालीद्वारे निवड झालेल्या शिक्षकांना शाळा नियुक्त्या देण्यासाठी आयोजित समुपदेशन प्रक्रियेसाठी एकूण 1 हजार 38 शिक्षक उमेदवारांना पाचारण करण्यात आले होते. सोमवार, मंगळवार अशा दोन दिवस पार पडलेल्या समुपदेशनासाठी 26 शिक्षक उमेदवार गैरहजर राहिले असून 1 हजार 16 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली. हे सर्व शिक्षक नव्या शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्य़ातील प्राथमिक शाळांवर हजर होणार आहेत.

जिल्हा परिषदाया प्राथमिक शाळांवरील नव्या शिक्षक भरतीसाठी गेल्या सोमवारपासून प्रारंभ झाला आणि मंगळवारी या समुपदेशनी सांगता झाली. निवड झालेल्या राज्यभरातील शिक्षक उमेदवारांनी या समुपदेशनासाठी रत्नागिरीत प्रतिसाद दिला आहे. सन 2017 व 2024 या कालावधीत शिक्षण सेवक भरती प्रकियेमध्ये राज्यातील उमेदवारांची निवड करण्यात आली होती. मराठी दिव्यांग उमेदवार 21, पदवीधर मराठी माध्यम 8, विज्ञान व गणित दिव्यांग 2, उपशिक्षक महिला मराठी माध्यम 359, पदवीधर महिला मराठी माध्यम 31, पदवीधर विज्ञान व गणित 75 आणि उपशिक्षक पुरूष मराठी माध्यम 379 उमेदवारों समुपदेशन पार पडले आहे.

या समुपदेशनात 22 शिक्षक उमेदवार गैरहजर होते. एकूण 1 हजार 16 उमेदवारों समुपदेनाने शाळा नियुक्ती देण्यात आली आहे. हे सर्व नवीन शिक्षक येत्या शेक्षणिक वर्षाया प्रारंभाला त्या त्या शाळांवर हजर होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील प्राथमिक शाळांवरील रिक्त जागांवर शिक्षक मिळण्या मार्ग मार्गी लागला आहे.