शिक्षक भरतीसाठी समुपदेशनाला पहिल्या दिवशी प्रचंड गर्दी

रत्नागिरी:- जिल्ह्य़ातील नव्या शिक्षक भरतीसाठी पवित्र प्रणालीद्वारे निवड झालेल्या शिक्षकांना शाळा नियुक्त्या देण्यासाठी रत्नागिरीत आयोजित समुपदेशन प्रक्रियेला सोमवारपासून प्रारंभ झाला. राज्यभरातून निवड झालेल्या शिक्षक उमेदवारांनी पहिल्या दिवशी समुपदेशनासाठी प्रतिसाद दिला.

सन 2017 व 2024 या कालावधीत शिक्षण सेवक भरती प्रकियेमध्ये राज्यातील उमेदवारांची निवड करण्यात आली होती. त्यांच्यासाठी सोमवारी 20 मे आणि मंगळवारी (ता. 21) रत्नागिरीतील शिर्के हायस्कूल येथे सकाळी ठीक 8 वाजता समुपदेशन प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त व खेळाडू या समांतर आरक्षणामधून निवड झालेल्यांना संबंधित कार्यालयांचा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नियुक्ती दिली जाणार आहे.
सोमवारी या समुपदेशनासाठी येथील शिर्के हायस्कूलमध्ये उपस्थित शिक्षक उमेदवारांमुळे मोठी गर्दी झालेली होती. यादिवशी सकाळी 9 ते 9-30 या वेळेत मराठी दिव्यांग उमेदवार 21, पदवीधर मराठी माध्यम 8, विज्ञान व गणित दिव्यांग 2, उपशिक्षक महिला मराठी माध्यम 359, पदवीधर महिला मराठी माध्यम 31, सायंकाळी पदवीधर विज्ञान व गणित 75 अशा उमेदवारांना पारण करण्यात आलेले होते. आज मंगळवारी उपशिक्षक पुरूष मराठी माध्यम 379 उमेदवारों सकाळी 9 वाजता समुपदेशन सुरू होणार आहे. या संबंधित उमेदवारांनी समुपदेशनासाठी उपस्थित राहणे आवश्यक असल्यो शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.