रत्नागिरी:- वांझोळे-देवरुख (ता. संगमेश्वर) येथे प्रौढ घराच्या शेत जमिनीतील आंब्याच्या झाडाच्या फांद्या तोडत होता. अचानक त्याला चक्कर आल्याने झाडावरुन पडला. उपचारासाठी देवरुख येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कृष्णा गंगाराम नटे (वय ५०, रा. वांझोळे-देवरुख, ता. संगमेश्वर) असे जखमी प्रौढाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १६) सकाळी साडेदहाच्या सुमारास वांझोळे येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा नटे हे सकाळी आपल्या शेतजमिनीत असलेले आंब्याच्या झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी गेले होते. झाडावर चढलेले असताना अचानक त्यांना चक्कर आली आणि ते पडले. त्यांच्या उजव्या पायाला मुका मार लागला. जखमी अवस्थेत त्यांना देवरुख येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी १०८ रुग्णवाहिने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या उपचार सुरु आहे. या प्रकरणी रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.