महाजन क्रीडासंकुल येथे दारू पिणाऱ्या संशयितावर गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील प्रमोद महाजन क्रीडासंकुल येथे दारू पिण्यासाठी बसलेल्या संशयितावर शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास ही कारवाई केली. प्रसाद, नागनाथ बोरकर (रा. लक्ष्मीकांतवाडी-मिरजोळे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मे २०२४ रोजी शहर पोलिसांचे पथक कै. प्रमोद महाजन क्रीडासंकुल येथे गस्त घालत होते. यावेळी संशयित आरोपी हा दारूची बाटली पुढ्यात ठेवून बसलेल्या स्थितीत पोलिसांना आढळला. त्यानुसार त्याच्याविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.