टिआरपी येथे मोटारीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जखमी

रत्नागिरी:- शहरातील टिआरपी येथे मोटार निष्काळजीपणे चालवून दुचाकीला पाठीमागून ठोकर देणाऱ्या मोटार चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवप्रसाद महादेव कोरे (रा. रवींद्रनगर, कुवारबाव, रत्नागिरी) असे संशयित मोटार चालकाचे नाव आहे. ही घटना ३० मार्च २०२४ दुपारी एकच्या सुमारास रत्नागिरी ते हातखंबा रस्त्यावरिल टीआरपी साईएजन्सी बसस्टॉप समोरील रस्त्यावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित चालक शिवप्रसाद कोरे यांनी मोटार (क्र. एमएच-०८ बीसी ३४३८) ही निष्काळजीपणे चालवून टिआरपी येथे दुचाकी (क्र. एमएच-०८ बीबी ५६६८) यावरील चालक बनवारी जयलाल मिना यांच्या ताब्यातील दुचाकीला पाठीमागून ठोकर देऊन अपघात केला. या अपघातात बनवारी मिना यांना दुखापत झाली. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष गायकवाड यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरन पोलिसांनी बुधवारी (ता. १५) शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.